– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता.२६) रोजी शोध पथकाने ७८ प्रकरणांची नोंद करून ३६,४०० रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/ उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून रु. ५०० रुपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून १०,४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रू.१०० चे दंड वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रू.८०० चे दंड वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २,००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून ३००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १,००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १,००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ३३ प्रकरणांची नोंद करून ६,६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १० प्रकरणांची नोंद करून रु. १०,००० चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत भूषण भांडस्कर यांनी नागरी भागात पोल्ट्री फार्म उघडल्यामुळे रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. स्वाती स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. खरे किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. गोपाल कंसट्रकशन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु.१०,००० दंड वसूल करण्यात आले.आसीनगर झोन अंतर्गत मे. ऑरेंज होम बिल्डर्स एंड डेवलपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु.१०,००० दंड वसूल करण्यात आले.मंगळवारी झोन अंतर्गत मे. सेंट मेरी स्कूल यांनी विनापरवानगी सार्वजनिक रस्ता तोडल्यामुळे रु.५,००० दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने ६ प्रकरणांची नोंद करून रू. ४०,००० दंड वसूल केला.




