spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची खरेदी करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावा – सुहास गाडे

– ‘उमेद’अंतर्गत फराळ विक्रीसाठी बाजारपेठ; जिल्हा परिषद प्रांगणात विक्री स्टॉल सुरू

गडचिरोली :- ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती दिवाळी फराळाची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिला बचत गटांच्या फराळाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना त्यांनी तयार केलेले पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची आणि विक्रीतून उत्पन्न वाढविण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांच्या उद्योजकतेला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी चकल्या, मोतीचूर लाडू, शेव, अनारसे यांसह विविध पारंपरिक घरगुती फराळाचे पदार्थ तयार केले आहेत. त्यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठी गावे, प्रभागस्तर आणि प्रत्येक पंचायत समिती परिसरातही विक्री स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या प्रांगणातील दिवाळी फराळ विक्री स्टॉलचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले.

Popular Articles