spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुटीबोरी आयटीआयमध्ये उत्साहात दीक्षांत समारंभ संपन्न

बुटीबोरी :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुटीबोरी येथे दीक्षांत समारंभ २१ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत कडू, डायरेक्टर, गायकवाड पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, मोहगाव तसेच कान्होलीचे उपसरपंच मिलिंद कोवे उपस्थित होते. यावेळी दोन्ही मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक शैलेंद्र कुंटे होते. यावेळी सुधीर कांबळे यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध ट्रेडमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झलेल्या या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

Popular Articles