काटोल :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. काटोल येथे अप. ७८४/२०२४ कलम ७४, ७५, ७६, ३५१(३), ३५२ भादंवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, दिनांक १२/०९/२०२४ रोजी फिर्यादी हे त्यांची अल्पवयीन पिडीत मुलगी वय १२ वर्ष ०६ महिने हिचेसह राशनचे धान्य आणण्याकरीता त्याचे मोपेड गाडीने आले व राशनचे धान्य घेवुन परत जात असता हातला बस स्टॉप जवळ यातील आरोपी नामे वैभव संजय पोजदार, वय २६ वर्ष, रा. हातला ता. काटोल जि. नागपूर याने फिर्यादीला मौजा डोरली गावापर्यंत सोडुन दे असे म्हणुन आरोपी हा फिर्यादीचे गाडीवर त्याचे मागे बसला त्याचे मागे फिर्यादीची मुलगी असे मिळुन ट्रिपलसिट गावाकडे जात असता मौजा चारगाव जवळ यातील आरोपी याने फिर्यादीचे मुलीचे दोन्ही हात पकडुन एका हाताने तिला अश्लिल स्पर्श करून तिचा विनयभंग केला. फिर्यादीने हटकले असता फिर्यादीला आणि त्याच्या मुलीला जिवाने मारण्याची धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले, नेमणुक पोस्टे काटोल यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी दोषारोपत्र मा. न्यायालयात दाखल केले. आज दिंनाक ०९/०३/२०२६ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायधीश कं ०३ श्री एस.एच. ग्वालानी यांनी वरील नमुद आरोपी वैभव संजय पोजदार, वय २६ वर्ष, रा. हातला ता. काटोल जि. नागपूर यास १) कलम ७४ भान्यासं मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास २) कलम ७५(i) (ii) भान्यासं मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास ३) कलम ७६ भान्यासं मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व १०००/-रू दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास ४) ३५१ (२) भान्यासं मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास ५) ३५२ भान्यासं मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू दंड. दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास ६) कलम ०८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रू दंड. दंड न भरल्यास ०२ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने ए.पी.पी. कल्पना पी. पांडे यांनी काम पाहीले. सदर खटल्याच्या सुनावली दरम्यान पराग पोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल विभाग, पोलीस निरीक्षक विशाल गिरी, दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण, पोनि रंजीत सिरसाठ, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन काटोल, सपोनि विशांत नांदगाये, दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार बाबा नेवारे, व. नं. ८२ पोस्टे काटोल यांनी मदत केली आहे.