spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध ५२ पत्त्यांचा जुगार; आरोपींवर गुन्हा नोंद

देवलापार :- देवलापार पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा मोरफाटा दर्गा शिवार येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) अक्षय कवडु धारने, वय २५ वर्ष, रा. वार्ड कं ५, कांद्री माईन मनसर २) कुणाल ज्ञानेश्वर मेश्राम, वय २० वर्ष, रा. वार्ड क्र. ९ नगरधन, ता. रामटेक, जि. नागपुर ३) राजेंद्र रामचंद्र पराये, वय ५५ वर्ष, रा. कुमारटोली, जुनाबगडंगज नागपुर ४) प्रशांत दिनेश आकरे, वय २५ वर्ष, रा. गरबा चौक, बगडगंज नागपुर ५) दिपक सुरेश सराटे, वय २६ वर्ष, रा.ईतवारी दही बाजार, झाडेचौक नागपुर हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन नगदी १६००/- रूपये असा एकुण १६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन देवलापार येथे १२ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles