spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंगणघाटात कथित देहव्यापाराचा पर्दाफाश

– नंदोरी रोडवरील पंढरी नगरीत पोलिसांची धडक कारवाई

वर्धा :- हिंगणघाट शहरातील नंदोरी रोड परिसरातील पंढरी नगरी येथे भाड्याच्या घरात सुरू असल्याचा संशय असलेल्या देहव्यापाराच्या प्रकारावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी कारवाई केली. अचानक टाकलेल्या छाप्यात दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाइल फोन आणि काही संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पंढरी नगरी परिसरातील एका भाड्याच्या घरात गेल्या काही दिवसांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय पातळीवर तपास सुरू केला. त्यानंतर ठाणेदार अनिल राऊत यांनी विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.

गुरुवारी दुपारी पोलिसांनी एका खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर ठाणेदार अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित घरावर अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. घरातून रोख रक्कम, मोबाइल फोन आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित ठिकाणी हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्ह्याची अधिकृत नोंद झालेली नव्हती.

पोलिस पथकाची कारवाई

ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी जमादार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, मंगेश वाघमारे, किशोर कडू, विजय हरनुल, अपर्णा डोंगरे आणि महिला पोलीस कर्मचारी सीमा लोखंडे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Popular Articles