spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएम श्री जि प शाळा दहेगाव येथे परसबागेची निर्मिती

किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेत परसबाग असणे आवश्यक आहे. परसबाग तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना मध्ये विविध भाज्या व फळभाज्या उपलब्ध करून देणे व आहाराची सकसता वाढवणे ही आहे, त्या अनुषंगाने पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी पालक ,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने या सत्राच्या सुरुवातीपासून परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे.

सदर परसबागेची ही जून महिन्यातच पूर्वतयारी केली असून त्यामध्ये बियाणांची लागवड करण्यात आली व शाळा सुरू झाल्यानंतर लगेच पालक, मेथी ,सांबार इत्यादी पालेभाज्यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पोषण आहारात समावेश करण्यात आला, त्यामध्ये वांगी ,टमाटर ,दोडकी, मिरची, बीट ,मुळा, भेंडी यांची सुद्धा लागवड करण्यात आली आणि ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात समावेश करण्यात येत आहेत. काही भाज्या उदाहरणार्थ जास्तीचे पालक, सांभार आणि कारले तसेच झेंडूची फुले यांचे हार बनवून नवरात्र उत्सवात त्याची विक्री करण्यात आली. या माध्यमातून शाळेला आर्थिक मदत सुद्धा झाली .या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळले आणि आपणही शाळेसाठी आर्थिक सहभाग देऊ शकतो याची जाणीव सुद्धा त्यांना झाली .या परसबागमधून जे उत्पादन होते त्याचा वापर शालेय पोषण आहारात वापर केला जातो. शालेय परसबाग कशी असावी याचे मार्गदर्शन मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सदस्या यांच्या सक्रिय सहभागामुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद लिलाधर काळबांधे ,राजेश रोहाड, सुधीर कांबळे , सुधीर खंडाईत , सुजाता बोधेले ,प्रज्ञा रामटेके, संगीता आंबिलढुके,उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांच्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर अशी परसबाग निर्माण झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.