खापा :- सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० वी जयंती निमित्त नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ७ वाजता स्थानिक पोलिस ठाण्यात देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी वॉक फॉर युनिटी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्ताने ही पायदळ रॅली खापा स्टेशन येथून सुरू झाली आणि जुने बसस्थानक, बाजार चौक, नगर परिषद कार्यालय, पतिराम महाराज वाडी आणि बसस्थानक मार्गे येऊन पोलिस स्टेशनला समारोप झाला. यावेळी खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे, अधिकारी नासरे, जगदीश पालीवाल, सचिन जंगम, मनीषा चौहान, नारायण बोरकर, नितेश चिपडे, परवेज शेख, श्याम सोळंकी, विशाल महालकर, प्रकाश नांदुरकर, संजय दशमवार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील व्हिजन ट्युशन क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व पोलिस पाटील, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख, मुकेश पावडे, रितेश ठाकुर, अंशुमन कालावडिया, सौरभ शेंडे, अक्षय पवार, निखिल खुबाळकर, आणि खापाचे नागरिकही उपस्थित होते.




