खापा :- ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे, या उद्देशाने नवयुवक व्यापारी मित्र मंडळ व खापा शहरवासीयांच्या वतीने बँक ऑफ बडोदा शाखा बाजार चौक, संत पतिराम महाराज नाट्य मंडळ, माताखेडी, जय बजरंग मंडई उत्सव मंडळ, शहारपुरा, व्यापारी मंडळ भवानी माता मंदिर चौक येथे दोन दिवसीय मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार (दि. ३१ऑक्टोंबर) रिकी अँड रेकॉर्डिंग डान्स ग्रुप भंडारा द्वारा प्रस्तुत कोल्हापूर झिंगाट यांच्या माध्यमातून विविध नृत्य सादर करण्यात आली. शनिवार (दि. १ नोव्हेंबर) रोजी अमर गायन पार्टी तुर्रा घराणे, लाखनी (सोमलवाडा) जि. भंडारा शाहीर आर्यन नागदेव व संच यांनी विनोदी समाज प्रबोधनपर नाटक तसेच राष्ट्रीय आजाद कलापथक निळा निशान, नवेगाव जि. चंद्रपूर शाहिरा जया बोरकर व संच यांनी विविध कला प्रकारांतून रंग भरला. दोन्ही शाहीर लोकांनीं सामाजिक समसयांवर प्रकाश टाकला व जनजागृति केली.
नवयुवक व्यापारी मित्र मंडळ, बँक ऑफ बडोदा चौक, खापा येथे संचालन मकसूद शेख तर आभार प्रदर्शन गोपाल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन छगन कवडे, मृणाल हरडे, आकाश लखपती, सचिन तुमाने, रवी कवडे, कैलास कापसे, बाल्या भुसारी, विजय हेडाऊ, स्वप्निल धराडे, कपिल देशमुख, विक्की कावनपुरे व व्यापारी यांनी केले. मंडईला आवर्जुन शहरातील सन्माननीय नागरिक उपस्थित होते.
संत पतिराम महाराज नाट्य मंडळ, माताखेडी येथे शुक्रवार (दि. ३१ऑक्टोंबर) अश्विन रेकॉर्डिंग डान्स ग्रुप, नागपूर, यांचा रेकॉर्डिंग डान्स, शनिवार ( दि. १ नोव्हेंबर) रोजी शाहीर प्रभाकर झटाले, तुर्रा पार्टी, चिचोली, जि. वर्धा, सुरज नवघरे कलंगी पार्टी, निलज, (खंडाळा) ता. पारशीवणी व संच यांचा दुय्यम खडा तमाशा कार्यक्रम झाला. आयोजन अखिल लाड, मुकेश बावणे, देवेंद्र कोल्हे, दिवाकर बोंदरे, विक्की सुरजुसे, रमेश बोंदरे यांच्यासह माताखेडी वासियांनी केले.
जय बजरंग मंडई उत्सव मंडळ, शहारपुरा हनुमानघाट येथे शुक्रवार (दि. ३१ऑक्टोंबर) रोजी लयभारी लावणी डान्स ग्रुप, नागपूर, यांचा रेकॉर्डिंग डान्स, शनिवार ( दि. १ नोव्हेंबर) रोजी शाहीर मधुकर शिंदेमेश्राम मु. नांदगाव, तुर्रा पार्टी व संच यांचा खडा तमाशा कार्यक्रम झाला. आयोजन खेमराज बारापात्रे, धनंजय बारापात्रे, मनोज बावणे, स्वप्निल कोहाड, आकाश बारापात्रे, प्रमोद धार्मिक यांच्यासह शहारपूरा निवासी नागरिकांनी केले.
व्यापारी मंडळ, भवानी माता मंदिर बाजार चौक येथे शुक्रवार (दि. ३१ ऑक्टोंबर) रोजी लावण्या अप्सरा लावणी डान्स ग्रुप, नागपुर यांचा रेकॉर्डिंग डान्स, शनिवार (दि. १नोव्हेंबर) रोजी शाहीर दिलीप काळे, कलंगी पार्टी, कान्हादेवी ता. पारशिवनी व शाहीर देवराव, तुर्रा प्रकाश मंडळ, लावा, जि. नागपूर व संच यांचा दुय्यम खडा तमाशा कार्यक्रम झाला. आयोजन मिलिंद बुरडे, प्रशांत बोंदरे, अज्जु शेख नागपुर, संदीप पराते, जितेंद्र जरवेकर, दिपक हटवार, गौरव कोल्हे यांच्यासह भवानी माता मंदिर चौक येथील व्यापारी व नागरिकांनी केले.




