जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी डी. एस. शेंद्रे यांची निवड

0
56
तिरोडा ५ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडेलोहारा येथे कार्यरत सहा. शिक्षक दुर्योधन सुखदास शेंद्रे यांची २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत जिल्हा पुरस्कार कार्यक्रम १५/०९/२०२५ ला त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षक दुर्योधन शेंद्रे यांनी शालेय शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, समाजाभिमुख  उपक्रम, संशोधन, व्यसनमुक्तीचे सामाजिक कार्य, आणि  विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्य मुळे पुरस्कार देण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत एकूण २३ निकषानुसार त्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे