spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स फोडले; चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

– तीन दिवसांत दोन ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये चोरी; व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कन्हान :- शहरातील गणेशनगर परिसरातील दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स या दुकानाचे शटर फोडुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) ला जुलै सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात असुर क्षिततेची भावना निर्माण झाली असुन अवघ्या तीन दिवसांत दोन ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी श्यामलाल मनीराम रोकडे वय ६० वर्ष, रा. रामनगर कन्हान हे गेल्या २६ वर्षांपासुन ज्वेलर्सचा व्यवसाय करित आहेत. सोमवार ला रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मंगळवार (दि.१४) जुलै ला सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलुप तुटलेले दिसले. पोलिसांच्या उप स्थितीत दुकान उघडुन पाहिले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तपासणीत चांदी च्या १५ अंगठ्या, १२ हातकडे, २० जोड बिछवे, ३ जोड तोरड्या, १० चांदीची नाणी, गणेश-लक्ष्मीची चांदीची मूर्ती, सुमारे २ ग्रॅम सोन्याचे मणी तसेच ३ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकुण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी कर ण्यात येत असुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. दरम्यान याच आठवड्यात न्यू गोंडेगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातही चोरीची घटना घडल्याने अवघ्या तीन दिवसांत दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली गेली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढ वुन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Popular Articles