spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उद्धव ठाकरे यांचे “राम रक्षा” आंदोलन एक थोतांड :मुख्यमंत्री असतांना “राम राज्य” व हिंदुत्व सुद्धा विसरल्याने सगळे शिव सैनिक सोडून गेले 

मुंबई :- उद्धव ठाकरे यांना सर्व विश्वासू व प्रामाणिक शिव सैनिक सोडून गेल्यावर आता बहू भार्या धारक व पोटभरू पगारी मूठभर चमचे घेऊन नागपुर येथे येत्या १८ जुलै रोजी आयोजीत “राम रक्षा आंदोलन एक थोतांड असुन यामुळे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री असतांना जो रामाचा उपमान केला याची आठवण लोकांच्या स्मृती मध्ये जागृत होईल त्यांनी अयोध्या येथे दोन तीन दिवस आपल्या पापांचे परिमार्जन करावे व जराशी नैतिकता आल्यावर “राम मंदिर मुक्ती आंदोलन” करावे असा सविनय सल्ला शेतकरी नेते त्यांचे फारच जवळचे मित्र किशोर तिवारी यांनी दिला व प्रभु राम हे सगळ्या जगाचे रक्षण करतात त्या प्रभू रामाची रक्षा पोटभरू पगारी मूठभर चमचे घेऊन आपण करण्याचे सोंग कराल व भाजपला १५ आमदार व ४० महानगर पालिकेचे कॉर्पोरेटर फोडण्याची संधी देऊ नका कारण आपण पक्षाचे रक्षण करू शकत नाही ते रामाचे काय रक्षण करणार असे मला सर्व आपल्या जवळचा माणुस म्हणुन प्रश्न विचारत आहेत खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .

किशोर तिवारी हे २०१९ पासुन २०२५ पर्यंत सर्व राष्ट्रीय माध्यमावर उद्धव ठाकरे यांचा बचाव करीत होते ज्यावेळी सर्व बहूभार्या धारक व पोटभरू पगारी मूठभर चमचे कोराना काळात खिचडी वाटपाचे ,आरोग्य सेवेचे व इतर अनेक कंत्राट घेत होते तर आपल्या मंत्रिमंडळाचे मंत्री दिया सालियन यांच्या प्रेमात रमले होत त्यांचा व सर्व मातोश्री चोरांचा किशोर यांनी अभूतपूर्व बचाव केला मात्र त्याच्या बदल्यात लोकसभा व विधान सभेच्या निवडणुकीत तिकीट विक्रीला व खुल्या खाबुगिरीला विरोध केला किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली होती मात्र तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत न जाता आपला लढा मोदींच्या हुकूमशाही भ्रष्टाचार व शेतकऱ्यांच्या ग्रामीण जनतेच्या समस्यांवर सुरूच ठेवला आहे .

उद्धव ठाकरे यांनी स्व बाळासाहेबांचा वारसा गमावला

गडचिंचले , डहाणू तालुका, पालघर जिल्हा १६ एप्रिल २०२० रोजी श्री पंच दशनाम जुना आखाडा’शी संबंधित दोन साधूंचा समावेश होता महाराज कल्पवृक्षगिरी (वय ७० वर्षे), सुशीलगिरी महाराज (वय ३५ वर्षे) आणि निलेश तेलगडे (वय ३० वर्षे, त्यांचा चालक). यांची अमानवीय हत्या झाल्या नंतर आपली भूमिका एकदम हिंदू विरोधी होती आपण गडचिंचले , डहाणू तालुका, पालघर येथे साधी भेट दिली नाही त्यामुळे सर्व संत समाज आपल्या विरोधामध्ये गेला .जर नवनीत राणा व रवी राणा यांना मातोश्री हनुमान चालीसा गाण्यासाठी आदराने आमंत्रित केले असते तर आपली हिंदी विरोधी प्रतिमा झाली नसती .संघाला वारंवार शिव्या देणे तसेच स्वातंत्र वीर सावरकरांचा उपमान होत असतांना मौन घेऊन चूप राहणे .संजय राऊत यांना दररोज फोन करून कोणा कोणाला शिव्या देण्याचे आदेश देणे यामुळे आपली निगेटिव्ह इमेज समोर आली आहे व आपला पुत्र प्रेम व त्याचे निष्ठा नाही विष्टा गेली हे उवाज .आपल्या वरुणाचा ठाणे मध्ये हैदौस व घराणे शाही चमचे शाही आपल्याला जनाधारशून्य करीत आहे ,असा आरोप किशोर तिवारी यांनी केला .

विदर्भात विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या व अनियंत्रित भ्रष्टाचार बेरोजगारीवर आंदोलन करा 

सध्या अख्ख्या विदर्भात १७५९ शेतकऱ्यांच्या यावर्षी आत्महत्या झाल्या आहेत ,पीक विमा नाकारण्यात आला आहे ,पाक कर्ज वाटप २४ टक्के , थर्मल ऊर्जा केंद्रात १० हजार कोटींचे देयके का न करता काढण्यात आली आहे .आदिवासींचे अस्तिव अधिकार संपविले जात आहेत .कंत्राट ५० टक्के कमिशन घेतल्या शिवाय देण्यात येत नाहीत ,४२ लाख बहिणी लाडक्या राह्ल्या नाहीत ,सर्व मेगा प्रकल्प पॉट भरण्याचा धंदा झाला आहे मात्र आपण यावर बोलणार नाही कारण समृद्धी मध्ये आपण ५० टक्के कमीशन घेतले होते .उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर येऊ नये यासाठी भावी पंतप्रधान अमित शहा यांच्याशी सुपारी घेऊन आपण “राम रक्षा आंदोलन ” करीत आहे अशी खुली चर्चा माध्यमांमध्ये आहे तरी हे आंदोलन टाळावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .

Popular Articles