अमरदिप बडगे, तिरोडा २९ :- तालुक्यातील भिवापूर येथील दिपाली प्रकाश पटले गोंदिया जिल्ह्यातून वर्धा येथे 24 आगष्ट ला झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले. तर तिरोडा येथे तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 28 आगष्ट ला आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये दिपाली पटले ने प्रथम स्थान पटकावून भिवापूर गावाचे नाव लौकीक केले आहे.दिपालीच्या यशाबद्दल बद्दल गावचे पोलीस पाटील कैलास रामटेके यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी सुखराम उके, कमल शेंडे, प्रदीप मेश्राम, मोनेश निवारे, मोतीराम पटले, खेमराज तुरकर, नरेंद्र मेश्राम उपस्थित होते. द आकार एथेलीस्ट अँड फिटनेस क्लब तिरोड्याचे संचालक आकाश भोयर यांनी सुद्धा दिपालीचे आभार मानून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत



