दिव्यांग मुलांच्या शाळेत श्री गणेश विराजमान..

0
45

सचिन चौरसिया, रामटेक २९ :- स्नेहसदन बौद्धिक अक्षम मुलांची शाळा, शितलवाडी रामटेक येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिव्यांग मुलांच्या कल्यानार्थ स्नेसदन परिवार म्हणून या शाळेत श्री गणेश मागील ४ वर्षांपासून विराजमान होतात. या काळात वसतिगृह व शाळा विभागात नवचैतन्य निर्माण होतं असून विविध कार्यक्रम या काळात घेण्यात येतात. या सर्व उपक्रमात बौद्धिक अक्षम मुले सहभागी होतात ज्यामुळे मुलात एकाग्रता निर्माण होऊन मुले स्थिर होतांना दिसून येतात अशी भावना यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.. या शाळेतील वसतिगृहात ३० निवासी मुले व अनिवासी ४३ असे एकूण ७३ राहत असून समाजातील ज्या सन्माननीय अनुभवनां या मुलांकरिता प्रसाद म्हणून जे पण पाठवायचे राहिल्यास शाळेतील वसतिगृह अधीक्षक अशोक पातोडे यांच्याशी संपर्क साधावा अशी शाळेद्वारा विनंती करण्यात आली.