spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भेसळयुक्त खाद्यतेल विक्री विरोधात तात्काळ कारवाईची मागणी

– नागपुर शहरात डुप्लिकेट खाद्यतेलाचा सुळसुळाट; प्रशासनाने कठोर कारवाई करावी

कन्हान :- भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री करणाऱ्या बाजारपेठे विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार प्रकाश जाधव, शिवसेना (उबाठा) नागपुर जिल्हा प्रमुख ग्रामिण पुरुषोत्तम मस्के, प्रवीण जमळे, सचिन साळवी, सुरेश आंबीलढुके, आदिंच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त (अन्न) नागपुर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेच्या दैनंदिन वापरातील खाद्य तेलामध्ये भेसळ करून ग्राहकांची फसवणुक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डुप्लिकेट नाव, चिन्ह, सील तसेच डब्यावरील बनावट लेबलचा वापर करून खाद्य तेल विक्री केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नागपुर शहरात विविध नामांकित ब्रँडच्या नावाने खाद्यतेल विकले जात असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाम तेलाचा वापर केला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अशा तेलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, खाद्य तेलाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार दिवसेंदिवस वाढत असुन काही ठिकाणी २४ तास व्यवहार सुरू असल्या चा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक न करता संबंधित ठिकाणी तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनाद्वारे मागणी :

खाद्य तेलाच्या नमुन्यांची तपासणी करावी, बना वट व भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करा व्यात अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.