spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोडेगाव (जुनी वस्ती) येथील धोकादायक परिस रातील नागरिकांचे पुनर्वसन व वाढीव भरपाईची मागणी

– वेकोलि, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व संबंधित प्रशासनाला निवेदन

कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील मौजा गोडेगाव (जुनी वस्ती) येथील धोकादायक घोषित परिसरातील नागरिकांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व संबंधित प्रशासनाला निवेद न देत तातडीने पुनर्वसन, वाढीव भरपाई आणि प्रलंबि त प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, वेकोलि च्या खाण कामामुळे परिसरात जमिनीला तडे जाणे, मोठ्या प्रमा णात भेगा पडणे, रस्ते व घरांना धोका निर्माण होणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन या परिसराला धोकादायक घोषित करण्यात आले आहे.

निवेदनात विभागीय आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या पुनर्सर्वेक्षणाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, “जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रक्रियेत न्याय्य भरपाई आणि पारदर्शकते चा अधिकार अधिनियम, २०१३” नुसार वाढीव भरपाई मंजुर करावी तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही अथवा फौजदारी कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच १९९३-९४ मध्ये अधिग्रहित जमिनीच्या बदल्यात पात्र शेतकऱ्यांना रोजगार किंवा एकरकमी आर्थिक पर्याय द्यावा, पुनर्वसन स्थळी सर्व मूलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, उर्वरित संपादित न झालेली शेती जमीन संपादित करावी आणि पात्र प्रकल्पग्रस्तांना रोजगार व इतर पुनर्वसन लाभ तातडीने मंजुर करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रणय ईश्वर खवले, पंजाब लांजेवार , रविंद्र पाहाडे, गुलाब राऊत, सेवक राऊत, नरेश शेंडे, अमित नागदेवे, प्रभुदास गजभिये, संदेश लांजेवार, प्रशांत चौधरी, दशरथ मोहन ठाकरे, संजय रासेगावक र, सुरेश हुकुम, कृपाविलास गजभिये, नरेश नाईक, रमेश नेवारे, बंडु वाघाडे, सिताराम राऊत, गणेश मोहु र्ले, अमरदीप गजभिये, मनोज गोंडाने, सोनु कनोजि या, देवकला मेश्राम, अर्चना गजभिये, वंदना गोळंगे, सुनिता नेवारे, प्रमिला रासेगावकर, कुसुम गजभिये, सुशिला सहारे, सुप्रिया मेश्राम, नर्मदा सोमकुवर यांच्या सह गोडेगाव (जुनी वस्ती) येथील नागरिकांच्या स्वाक्ष ऱ्या असुन संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दख ल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीस संबंधित प्रशासन व वेकोलि जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Popular Articles