सीताबर्डीतील नेताजी मार्केट येथील हार फुल दुकानदारा ला कळमना मार्केट येथे स्थानांतरित करण्याची मागणी

0
46

नागपूर :- हार फुल दुकानदार असोसिएशन जिल्हा नागपूरच्या वतीने पत्र परिषद घेण्यात आली. नागपूर मनपा अंतर्गत असलेले फुल बाजार मार्केट सिताबर्डी नागपूर येथील मार्केट कृषी उत्पन्न बाजार कळमना समितीत समाविष्ट करून घ्यावे. या मागणीसाठी फुल मार्केट हे मध्यभागी सीताबर्डीत असून वाहतुकीला व पार्किंग चा खुप त्रास होतोय. मार्केटचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आल्यानंतर त्यांना जागा कमी पडते फुल बाजार ही विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु मार्केट ची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे शेतकऱ्यांची लुटमार होत आहे. अनधिकृत रित्या पार्किंग असल्यामुळे गाडी ठेवण्यासाठी मनमानी 50 ते 100 रुपये वसुली करतात. अशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये यांनी सांगितले. सीताबर्डी फुल मार्केट मध्ये ओटा ची व्यवस्था केली असून सुद्धा काही लोकांनी रस्तावरच अतिक्रमण केले आहे. येण्या जाण्यासाठी एवढा त्रास होतो की फुल मार्केटमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण केले जात आहे. वाहतुकीस खोळंबा निर्माण झालेला आहे. मधातच दुकाने लावून बसलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नेताजी मार्केट मधील फुल मार्केट कळमना येथील स्थलांतरित करावे. ओट्याच्या व्यतिरिक्त खाली बसून अतिक्रमण केलेले आहे. त्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या साठी खूप त्रास होतो म्हणून हा मार्केट कळमना येथे शिफ्ट व्हावा. अशी आमची हार फुल दुकानदारांची इच्छा व मागणी आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये राजेश लांजेवार यांनी सांगितले. यावेळी सचिव राजेश लांजेवार, अध्यक्ष अरुण तितरमारे यांनी माहिती दिली आहे. यावेळी परिषदेत उपस्थितीत अरुण तितरमारे, राजेश लांजेवार, गणेश बोरकर, शिवराज बावनकर, नितीन गिरडकर, संजय जीभकाटे, विनोद बुटे, अक्षय साठवणे, आणि शेखर रणनवरे यांची उपस्थिती होती.