साईबाबा आश्रमशाळेत नविन मंदीरात तिन दिवसिय उत्सवाने श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

0
51

कन्हान :- साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.) येथे पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरातुन पालखी मिरवणुकीचे भ्रमण करून श्री साईबाबा यांच्या मुर्तीची विधीवत स्थापना करून स्वागत, सत्कार आणि भजन, किर्तन गोपाल काला आणि महाप्रसाद वितरण करून तीन दिवसीय साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

शनिवार (दि.११) ऑक्टोंबर सायंकाळी ५ वाजता साईबाबा आश्रम शाळा टेकाडी (को.ख.) ता. पारशिवनी जि. नागपुर येथिल पटांगणात नव्या ने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरातुन संकल्प रथ यात्रा व साईबाबा च्या पालखी शालेय विद्यार्थी, भजन मंडळी, लेझिम पथक, डिजे सह मिरवणुकीने भ्रमण करून पालखी मंदीरात परत आली.

रविवार (दि.१२) ऑक्टों बर ला सकाळी ८ वाजता श्री साईबाबा मुर्तीचे विधीवत पुजन करून दिवस भर भजन, पुजा अर्चना करून सांयकाळी ४ वाजता मंदीरात श्री साईबाबा ची मुर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करून सायंकाळी ६ वाजता आरती करून प्रसाद वितरण करून रात्री ८ वाजता स्वागत सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जैस्वाल, नितीन तेलगोटे, माजी आमदार टेकचंद सावरकर, आदिवासी उपायुक्त नागपुर दिंगाबर चव्हाण, भाजप पदाधिकारी आशिष पाठक, शाळेचे संचालक तथा आदिवासी आश्रमशाळा संघाचे सचिव किशोर वानखेडे, हर्षा किशोर वानखेडे, सचिव राजेश सरोदे आदीसह महाराष्ट्रातुन आलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे संचालकांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोमवार (दि.१३) ला सकाळी आरती, भजन, किर्तन करून दुपारी गोपाल काला करून ४ ते ८ वाजे पर्यंत महाप्रसाद वितरण करून तीन दिवसीय साईबाबा मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. श्री साईबाबा मुर्ती स्थापना उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साईबाबा आश्रम शाळेचे संचालक किशोर रा. वानखेडे, समस्त वानखेडे परिवार व आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक संजय काळे, प्राथमिकचे बालपांडे, अनिल वानखेडे, अभिलाश काळमेघ, शिक्षक निखाडे, यावले, डहाके, मेश्राम, चौधरी, डोंगरे, चव्हाण, मंहत, कदम, कापसे, आडे, सातपुते, खिळेकर, खंगार, शिक्षिका चव्हाण, पोपटे, नाईक, नरूले, साक्षी खोरे व शिक्षकेत्तर कर्मचारी चंदु चौधरी, गणेश हुड, पुरूषोत्तम पाटील, रंजित पाजुर्णे सह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.