spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मौदा तालुक्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले असूनही जि प व पं स चे आरक्षण घोषित होताच पहाटेला शेकोट्या न पेटवताच गावागावातील पान टपऱ्यांमधील राजकीय चर्चांमुळे वातावरण होत आहे गरम !

किशोर साहू, मौदा, ता.१५ :- मौदा तालुक्यात 13 ऑक्टोंबर पासून गुलाबी थंडीचे आगमन झालेले आहे. 13 ऑक्टोंबर ला तालुक्यातील 5 जि प व 10 प स चे आरक्षण जाहीर झाल्याने पहाटेला शेकोट्या न पेटवताच गावागावातील पान टपऱ्यांमध्ये राजकीय चर्चांमुळे वातावरण गरम होत आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी शुकशुकाट असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर होताच गर्दी दिसू लागली आहे.

चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्याने, या सर्कल मधून मागच्या पंचवार्षिक मध्ये निवडून आलेले भाजपचे कैलास बरबटे यांनी आरक्षण घोषित होताच त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून देताच, मंगळवार (दि. 14 ऑक्टोबर)ला चाचेर मधील बस स्थानकाजवळील पान टपरीवर माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह राजकीय चर्चा करताना दिसले.

पंचायत समिती चाचेर गण सर्वसाधारण तर निमखेडा गण अनुसूचित जाती महिला साठी राखीव झाल्याने तिथल्याही उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी येसंबा येथील उपसरपंच धनराज हारोडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, निसतखेडा येथील माजी सरपंच रजत महादुले , मेघशाम कुल्लरकर सह भाजपा व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मागच्या पंचवार्षिक चाचेर- निमखेडा जिल्हा परिषद निवडणुकीत कैलास बरबटे यांच्याकडून काट्याच्या लढतीत पराभूत झालेले देवेंद्र गोडबोले हे तारसा – धामणगाव हे जिल्हा परिषद सर्कल नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथून लढणार असल्याची चर्चा असल्याने, काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास खंडाळा (गांगणेर) चे माजी सरपंच मदन बरबटे जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. इतर पक्षातील उमेदवारांबाबत व इतर उमेदवारांबाबत सध्या अजूनही चर्चा सुरू व्हायची आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.