spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोदामेंढीत आज श्री विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव

किशोर साहू, मौदा ,ता.१५ :- कोदामेंढी येथे आज बुधवार( दि. 15 ऑक्टोबर)ला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान श्री विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव श्री गर्देश्वरी माता मंदिर परिसर येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वरी रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट चे संचालक एम सत्यनारायण रेड्डी, प्रमुख वक्ता म्हणून आरएसएस रामटेक विभाग, महाराष्ट्र कार्यप्रमुख मुकेश भांडारकर उपस्थित राहणार आहे.

पथसंचलन सायंकाळी साडेपाच वाजता निघणार असून सर्व स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात वेळेआधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोदामेंढी उपखंड कार्यवाह हार्दिक फाये यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बावनकुळे ,अनुज खंडाईत, नितीन बावनकुळे सह समस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यगण परिश्रम घेत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.