spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाची यंत्रणा दीक्षाभूमी परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत

नागपूर :- ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (ता.१४) दीक्षाभूमी येथे आलेल्या हजारो अनुयायांच्या सेवेसह संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेसाठी मनपाची यंत्रणा कार्यरत होती.

मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त तथा सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात स्वच्छतेच्या निगडित विविध कार्य करण्यात आली.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी आघाडी सांभाळून साफसफाई करण्यास सुरूवात केली. मनपातर्फे नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तसेच तीन मोबाईल प्रसाधनगृह सुविधासह, मनपाचे आरोग्य पथक आणि अँब्युलन्स सेवा या नागरी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय परिसरात अग्निशमन गाड्या आणि जवान दीक्षाभूमीवर तैनात होते.

त्याकरिता एजी इंनव्हायरो एजंसी सह सफाई कर्मचारी यांनी नियुक्ती करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मदतीला सफाई करण्याकरिता लहान मोठ्या अशा १० गाड्या लावण्यात आल्या. याशिवाय दीक्षाभूमी येथे आलेल्या अनुयायांना रीतसर कचरा पेटीत कचरा टाकण्यात यावा याकरिता कचऱ्याच्या पेट्यांची व्यवस्था केली गेली. पोलिस प्रशासन आणि मनपाचे कर्मचारी उपद्रव शोध पथक अनुयायांना मार्गदर्शन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.