spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिव छत्रपती नगरात अखंड रामायण पाठाने भक्तिमय वातावरण

कामठी :- शिव छत्रपती नगर येथे २४ तास अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. रामनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, मोठ्या संख्येने भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी होत आहेत.

या धार्मिक उपक्रमात जागृती जस मंडळातील सर्व सदस्य अखंड सेवा देत असून, त्यांचे सेवाभावी योगदान कौतुकास्पद ठरत आहे. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे.

यावेळी प्रतीक पडोळे,अजोरी विश्वकर्मा, महेश देवांगण, छनू शाहू, विलास सातपुते, विजय जैस्वाल, जीवन देवांगण, राजू रंधाई, दिनेश देवांगण, राकेश शाहू, क्रिश सातपुते, शांती विश्वकर्मा, शीला कळसकर यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. भाविकांनी रामनामाचा जप करीत अखंड रामायण पाठात भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

सेवा, श्रद्धा आणि संस्कारांची ही अखंड परंपरा अशीच पुढे चालत राहो, हीच श्रीराम चरणी प्रार्थना करण्यात आली.

Popular Articles