spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धनगर समाजाचा उपवधू वर परिचय मेळावा नागपूरात संपन्न

नागपूर :- धनगर समाजातील उपवर वधूंचा परिचय मेळावा गेल्या दशकापासून धनगर युवक मंडळ नागपूर व महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असून या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाहाच्या रेशीमगाठी बांधण्याचे कार्य सुरू आहे. या मेळाव्याचे आयोजन 11 जानेवारी 2026 रोजी, श्री संताजी महाराज सभागृह नागपूर येथे मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरीदास भदे माजी आमदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक बोराडे यांनी केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दीपक बोराडे यांनी आपल्या भाषणात स्व. बी.के.कोकरे यांच्या कार्याचा गौरव करून दि. 21 जानेवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे होऊ घातलेल्या धनगर एसटी आरक्षणाच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे धनगर बांधवांना आवाहन केले. हरिदासजी भदे यांनी स्व. रामदासजी शेटे गुरुजी यांना धनगर एसटी आरक्षणाचे जनक असे संबोधून त्यांनी धनगर आरक्षणाची मुहूर्तमेढ यवतमाळ येथे गाडली असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अनिलकुमार ढोले व पुरुषोत्तम डाखोळे यांनी आपल्या भाषणात उपवर वधू-वरांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.मान्यवरांच्या हस्ते उपवधू वर परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ. हर्षा पाटील यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मंडळाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. ज्ञानेश्वर ढोमणे यांनी मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाला देविदास आगरकर, रामदास माहुरे, अशोक सांभारे, दीपक अवताडे, यशवंत कातरे, साहेबराव सरोदे, विलास डाखोळे, त्रिलोकचंद खरबडे, सुषमा कानडे, नीलिमा ढोके, प्रतिमा आगरकर, गणेश पावडे, व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.