कन्हान येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

0
51

कन्हान :- जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे योग भवन हनुमाननगर कन्हान येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विविध सांस्कृति क कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सोमवार (दि.१२) जानेवारी २०२६ ला योग भवन हनुमाननगर कन्हान येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाच्या माजी नगराध्यक्षा शिवमती करुणा आष्टणकर यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी भाविका रामटेके सेवानिवृत्त अधिकारी, इंडियन ब्यूरो ऑफ माई न्स, मंदा बागडे सेवानिवृत्त शिक्षिका, सत्कार मुर्ती नगरसेविका पुनम राठी आदीच्या हस्ते राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेका नंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करू न जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकातुन जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा माया इंगोले यांनी राजमाता जिजाऊ, सावित्री बाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेविका पूनम राठी यांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी भाविका रामटेके यांनी जिजाऊ जयंती निमित्त उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सादर केलेल्या नृत्याने विशेष दाद मिळव ली. विशाखा ठमके यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून ‘ मी सावित्री बोलतेय ’ हा एक पात्री प्रयोग सादर केला. या यशस्विसादरी करणास जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव छाया नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती घोटेकर हयांनी तर आभार प्रदर्शन प्रिती कुकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लता जळते, अल्का कोल्हे, सुनिता येरपुडे, गोदावरी नागरे, माया भोयर, पुष्पा चिखले, सुरेखा अवचट, येलेकर ताई, मिनाक्षी भोयर, सुषमा बांते, मनिषा धुडस, वर्षा जुळे, उज्वला लोखंडे, संगिता बावनकुळे, सुधा सव्वालाखे, अनिता पाजुणे आदीसह जिजाऊ ब्रिगेड कन्हान शाखे च्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास महि ला, नागरिक व जिजाऊ ब्रिगेड च्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.