– उपोषणाचा सहावा दिवस
नागपूर :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी करावी या न्याय मागणीसाठी जालना येथील एक तरुण धनगर नेते दिपक बोऱ्हाडे, जालना येथे दिनांक 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्नपाणी सोडून समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अजुनपर्यंत सरकारनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.
म्हणून, सरकारलाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी व धनगरांची मागणी मान्य करावी. यासाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी उपोषणकर्ते दिपक भाऊ बोऱ्हाडे यांनी आवाहन केल्या प्रमाणे दिनांक 22 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटना च्यावतीने जिल्हाधिकारी, नागपुर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी, सकल धनगर संघटनेचे रमेश पाटील, पावडे साहेब, देविदास आगरकर, नामदेव खाटके, समन्वय समितीचे पुरुषोत्तम डाखोळे, धनगर समाज जागृती मंचचे श्री उत्तम चिव्हाणे, नंदकिशोर गवारकर, दिलीप ऊरकुडे, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे अशोक खाडे, विजय खुजे, अशोक चिव्हाणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूरचे महादेव पातोंड, विनोद बरडे, श्याम थोरात, सदाशिव पुनसे, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य व जिल्हा शाखा नागपूरचे विलास डाखोळे, शरद ऊरकुडे, रामचंद्र चुकांबे व यशवंत कात्रे, वैशाली कात्रे, सचिन शेटे, उपस्थित होते.




