spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मे रोजी ३०० शिलाई मशीनचे वाटप

नागपूर :- ३०० महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लायन्स क्लब्स इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, नागपूर येथील आधार नगरी-३, ईसासानी कॉम्प्लेक्स येथे ३०० मोफत शिलाई मशीन वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नागपूरचे महाराजा राजे मुधोजी भोसले (पीएमसीसी), आमदार समीर कुन्नरवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूरचे अध्यक्ष दीपक निलावार, नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी अध्यक्षा शिवाणी दाणी वखरे, लायन भरत बाळघाट (प्रांतीय गव्हर्नर, लायन्स इंटरनॅशनल), लायन विलास साखरे (उपप्रांतीय गव्हर्नर-१, लायन्स इंटरनॅशनल), लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटीचे अध्यक्ष सतीश राय, सचिव रुपेश रेवतकर यांच्यासह आर्य वैश्य महासभा महाराष्ट्रचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, गोविंदजी बिडवाई, प्रदीप कोकडवार आणि अध्यक्ष राजू मुक्कावर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. गरजू महिलांना सक्षम करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी ३०० महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले जाईल ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करता येईल. लायन्स क्लब नागपूर ग्रीन सिटी आणि आर्य वैश्य महासभेचे प्रकल्प संचालक राजेश चंद्र आणि विवेक कुन्नावार यांनी माहिती दिली की, या सेवेअंतर्गत शिलाई मशीन मिळवणाऱ्या महिलांची नावे आधीच निश्चित झाली असून, नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आप आपली जबाबदारी सक्रियपणे पार पाडत आहेत.

Popular Articles