किशोर साहू,मौदा :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संकल्पनेतून मौदा शहरातील गरजू दिव्यांग नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम मंगळवार( ता. 17 नोव्हेंबर)ला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यतिथी निमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,मौदा येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार घुले व शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी माजी तालुकाप्रमुख सदुकर हटवार, युवासेना मौदा तालुकाप्रमुख रूषभ बावणे, मौदा विविध सेवा सहकारी सोसायटी संचालक रामप्रसाद पराते,शहर संघटिका वंदना बुराडे,उपसरपंच उमेश भोतमांगे, युवासेना पंचायत समिती सर्कल प्रमुख स्वप्नील भोयर, युवासेना शाखाप्रमुख अभि बडे,बंडू तिवाडे,सुहास वासनिक,निखिल राऊत व पदाधिकारी,शिवसैनिक, गरजू दिव्यांग नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






