spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विष्णु-लक्ष्मी नगरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

– संविधान उद्देशिकेतुन संविधानिक मूल्यांचा संदेश 

कन्हान :- देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विष्णु-लक्ष्मी नगर, प्रभाग क्र. ३ येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवित स्वातंत्र दिवस सोहळा नगरसेवक समशेर पुरवले यांच्या पुढाकारातुन साजरा करण्यात आला.

कार्यक्रम काँग्रेस कमेटी नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरपरिषद कन्हानचे माजी उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, नीती तेलोते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शशिकांत दारुंडे, अंत्याजी लोंढे, सुनील भिसे, किरण शेंडे, दीपक पुरवले, लक्ष्मण पात्रे, सोमलाल पात्रे, लखन पात्रे, पप्पु पुरवले, विनोद पात्रे, सुमित पुरवले, रामनाथ लोंढे, अर्जुन गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, तसेच नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी नगर सेवक समशेर पुरवले यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत समाजहितासाठी अशा विधायक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण करणारा तसेच नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे कौतुक केले.

राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना कन्हान व्दारे स्वातंत्र दिवस साजरा

कन्हान : – राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना कन्हान च्या वतीने सत्रापुर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम माजी उपसरपंच विजय खडसे यांच्या अध्यक्षेत छत्रपति शिवाजी महाराज, भारत माता, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जेष्ठ समाजसेवक रामेश्वर शेंडे यांच्या हस्ते ध्वज फडकवुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी रामेश्वर शेंडे व विजय खडसे यांनी स्वातंत्र्य दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अर्जुन पात्रे यांनी केले . याप्रसंगी देवीदास खडसे, नारायण गजभिये, देवीदास पेटारे, प्रीतम शेंडे, रामु खडसे, देवानंद पेटारे, अनिल लोंढे, आकाश भिसे, अरविंद लोंढे, सुदेश हातागडे, मंगेश पात्रे, महेंद्र पात्रे, विक्की खडसे, महेश लोंढे, नीतेश पात्रे, मुरली पात्रे, सावन पात्रे, अभय पेटारे, आसन पात्रे, लेखु खडसे, उषा पात्रे, शिला पात्रे, मीना पात्रे, सीमा पेटारे, मंजु पात्रे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Popular Articles