spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्रीय विद्यालयातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Ø विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

यवतमाळ :- येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासन आणि विकासकामांसाठी कार्यरत विद्यालय व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीला प्राचार्य किरण मेंढे, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, अमोलकचंद विद्यालयाचे प्रा.डॉ. राहुल एकबोटे, अनिल इंगोले, प्रा. साहेबराव कदम, रचना घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र रामटेके, जि.पचे कार्यकारी अभियंता एस श्रावगी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्ताचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यालयातल्या चालू वर्षातील नोंदणीची स्थिती, विद्यार्थ्यांची कामगिरी, देखभाल, संवर्धन आणि सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगने नियुक्ती, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांसाठी कंत्राटी शिक्षकांचे पॅनेल तयार करणे, विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी रस्त्याचे बांधकाम, नवीन इमारतीत पाईप लाईन जोडणी आणि गटार व्यवस्था, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवणे, कचरा व्यवस्थापन करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.