spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी 2025

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, 20 वी ज्युनिअर व 25 वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा व सिटीचा संघ सहभाग करण्याकरिता दि. चंद्रपूर जिल्हा व सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 07 डिसेंबर 2025 रोजी रविवारला ठीक सकाळी 09:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर तसेच चंद्रपूर सिटीचे सचिव सुरज बंडू परसुटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे दि. चंद्रपूर जिल्हा व सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल.

तरी इच्छूक खेळाडूंनी सुरज परसूटकर (8669075173), बंडू डोहे (7066666105), हर्षल क्षिरसागर (706691570), ईश्वर पोर्थला (7755908124), राजकुमार भोयर (9823100282 ), इखलाख पठान (9834307243), राकेश ठावरी (8551976156), चंदन परसुटकर (9970770132), रिंकेश ठाकरे ( 8007172073), मिलिंद चौधरी (8668634835), मयूर बोनमपल्लीवार (8421726919), विशाल राठोड (9764921110), अहमद शेख (8007029426), रुचिता आंबेकर (8552925066), श्रुती घटे (9403908274), भाग्यश्री मेश्राम (9156076952 ), निखिता ढोरके (8551062243) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

01) U-19 वर्षांसाठी 20/12/2006 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

02) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.