spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चॅनेलवरील चर्चेत बदनामी केल्याबद्दल किशोर तिवारी यांना पाच कोटींची भरपाईची नोटीस

मुंबई :- एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चेत असत्य व बदनामीकारक वक्तव्ये करून भारतीय जनता पार्टी व आपली बदनामी केल्याबद्दल भाजपाचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांना बदनामीची नोटीस बजावली असून सात दिवसात या वक्तव्यांबद्दल त्याच वाहिनीवरून बिनशर्त माफी मागावी अन्यथा पाच कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

विश्वास पाठक हे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आहेत. त्यासोबत ते महावितरणसह अन्य सार्वजनिक वीज कंपन्यांचे स्वतंत्र संचालक आहेत. संबंधित इंग्रजी दूरचित्रवाणी वृत्त वाहिनीवरील चर्चेत त्यांनी दि. 1 डिसेंबर रोजी भाग घेतला. त्यावेळी किशोर तिवारी हे सुद्धा पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाले होते. यावेळी चर्चेत तिवारी यांनी विश्वास पाठक यांच्यावर बदनामीकारक आणि असत्य आरोपांच्या फैरी झाडल्या

किशोर तिवारी यांनी दावा केला की, विश्वास पाठक हे भाजपाचे प्रवक्ते नाहीत. तसेच किशोर तिवारी यांनी पाठक यांच्यावर कोल माफियाचे प्रवक्ते असल्याचा व भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला. भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला महालूटयुती असे संबोधून तिवारी यांनी पाठक यांच्यावर त्याचे घटक असल्याचाही आरोप केला तसेच भाजपाची बदनामी केली.

विश्वास पाठक यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आज दि. 2 डिसेंबर रोजी किशोर तिवारी यांना बदनामीकारक वक्तव्यांबद्दल नोटीस बजावली आहे. किशोर तिवारी यांनी असत्य व बदनामीकारक वक्तव्यांबद्दल सात दिवसात बिनशर्त माफी मागावी, माफी मागितली नाही तर त्यांनी अब्रुनुकसानीबद्दल पाच कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी तिवारी यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी खटला चालविण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.