जिल्हास्तरीय महसूल सेवा पंधरवड्याला विहिरगाव येथून सुरुवात

0
105

नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनांक 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर महसूल सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. विहीरगाव येथून जिल्हास्तरीय महसूल सेवा पंधरवाड्याची सुरुवात आज करण्यात आली.

याप्रसंगी संपूर्ण गावात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. गावात वृक्षदिंडी काढून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच गावात पाणंद रस्त्यावर मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. गावात फिरते सेतू केंद्र लोकार्पण करण्यात आले तसेच नेत्र तपासणी शिबिराचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले .

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार कल्याण कुमार दहाट, नायब तहसीलदार दिनेश हटवार, सचिन शिंदे, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, महिला सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य पथक, पोलीस पाटील व गावातील सर्व समस्त गावकरी व ग्रामपंचायत कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.