spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी,तिरोडा तालुका विजयी

तिरोडा :- तालुक्यातील नवेगाव येथील आदिती कला आणि विज्ञान ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत देवरी तालुक्याचा पराभव करून चमकदार कामगिरी केली. या रोमांचक सामन्यात तिरोडा संघाने ३०-२७ अशा गुणांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आदिती कॉलेज संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. या विजयासह आदिती कॉलेजने विभागीय फेरीत आपले स्थान निश्चित केले.महाविद्यालय संचालिका शोभा बनसोड, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Popular Articles