Home Latest News श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

0

<p><strong>&&num;8211&semi; जिल्ह्याचे सकल उत्पन्न व रोजगाराची स्थिती सर्वेक्षणातून उपलब्ध होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; राज्यात पहिल्यांदाच सर्वेक्षण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; अर्थ व सांख्यिकी विभागाच्या कार्यशाळेचा शुभारंभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> जिल्ह्याचा विकास झाला तरच राज्याचा विकास होईल&comma; विकसित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आर्थिक व सामाजिक निर्देशांक विकसित करणे आवश्यक आहे&period; या दृष्टीने श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणासाठीच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उप महानिर्देशक श्रीनिवास उप्पला यांच्या हस्ते झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>वनामती येथील सभागृहात नियोजन विभाग तसेच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे&period; यावेळी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके&comma; जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; कमल किशोर फुटाणे&comma; अतिरिक्त आयुक्त दिनेश वाघ&comma; सहआयुक्त डॉ&period; सुशील आग्रेकर&comma; अमरावतीच्या सहआयुक्त संध्या गवई&comma; सेवानिवृत्त अप्पर महानिर्देशक अशोक कुमार टोपराणी&comma; सहाय्यक संचालक सुनील वैरागडे&comma; आयपीएसओएस &lpar;ईप्सोस&rpar; या संस्थेच्या संचालिका तृप्ती शर्मा उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>विकसित भारत &commat;2047 याप्रमाणेच विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती आवश्यक आहे&period; या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नियतकालीन श्रमशक्ती सर्वेक्षण तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे&period; राष्ट्रीय सकल उत्पन्नावर राज्य व जिल्हा उत्पन्न तसेच इतर सामाजिक व आर्थिक निर्देशक परिगणित करण्यात येतात&comma; यावरून देशाच्या व राज्याच्या विकासाबाबतचे धोरणे ठरवून योजनांची आखणी करण्यात येते&period; मात्र आता ही परिभाषा बदलली आहे&period; जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू ठरुन जिल्ह्याचा विकास झाल्यास राज्याचा विकास होईल&comma; त्यासाठी जिल्हास्तरावर आकडेवारी निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमहा निदेशक श्रीनिवास उप्पला यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा हा विकासाचा मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे जिल्हास्तरीय रोजगार बेरोजगार यांची आकडेवारी असंघटित क्षेत्रातील उद्यमांची आकडेवारी तसेच रोजगार निर्मिती स्थिती इत्यादी निर्देशांकांची सविस्तर सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे&period; श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती व विविध निर्देशांकाद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास मदत होणार आहे&period; शासनाच्या विविध योजना आखण्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्यसहभाग दर&comma; रोजगाराची स्थिती तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांबाबतची जिल्ह्यातील सद्यस्थिती व त्यातून होणारी मूल्यवृद्धी याबाबतची सांख्यिकीय माहिती मिळणार असल्यामुळे या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व आहे&period; नागपूर व अमरावती विभागासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत&period; या सर्वेक्षणांतर्गत एकूण 6828 इतके नमुना घटक असून 276 अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे सर्वेक्षणाचे काम राज्यात पूर्ण करण्यात येणार आहे&period; नागपूर व अमरावती विभागात या दोन्ही सर्वेक्षणासाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 1774 नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे&period; हे सर्वेक्षण 55 अन्वेषक आणि 21 निरीक्षक यांच्यातील द्वारे पूर्ण करण्यात येणार आहे&period; या सर्वेक्षणासाठी जनतेने सहकार्य करावे तसेच प्रगणकांना अचूक माहिती द्यावी असे आव्हान यावेळी करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; कमल किशोर फुटाणे यांनी श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण ही महत्त्वाचे सर्वेक्षण असून सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर जिल्हा आणि विभागीय स्तरावर कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सह आयुक्त निशा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आयपीएसओएस &lpar;ईप्सोस&rpar; या संस्थेच्या संचालिका तृप्ती शर्मा यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version