spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मैदाने व उद्यानांचा डीपीआर राज्य सरकारकडे पाठविणार

– शहरात 200 मैदाने व उद्याने तयार करण्यासाठी मनपा

नागपूर :- पायाभूत सुविधांसोबतच शहरातील 200 उद्याने व 200 खेळांच्या मैदाने विकसित करण्यासाठी बृहद प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.

केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात 200 मैदाने व 200 उद्याने विकसित करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासंदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात (ता. 9) बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विभागाच्या सभापती दर्शनी धवड, नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक रितेश गावंडे, सुनील दांडेकर, सुषमा चौधरी, संजय ठाकरे, विनय दाणी,  बाबाराव तायडे, आलिशा फहीम खान, नगरसेवक सुहास नानवटकर, मुजतबा अंसारी, विनोद कन्हेरे, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त गणेश राठोड, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर उपस्थित होते.

डीपीआर त्वरित पूर्ण करा: नरेंद्र (बाल्या) बोरकर

यावेळी बोलताना सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी प्रत्येक प्रभागात पहिल्या टप्प्यात दोन उद्याने व दोन मैदाने विकसित करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेऊन मैदाने व उद्यानांची संकल्पना निश्चित करून त्वरित त्यासंदर्भात वॉक थ्रू पीएमसीच्या मदतीने तयार करण्याची सूचना केली. डीपीआर तयार करताना शहरातील 200 उद्याने व 200 मैदानांचा तयार करण्यात यावा. हा डीपीआर येत्या एक आठवड्यात राज्य सरकारकडे पाठविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना बोरकर यांनी केली.

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी शहरात मैदाने व उद्याने विकसित करण्याच्या संकल्पना राबविण्याची आवश्यकता असून यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना केली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी डीपीआर सविस्तर तयार करण्याची सूचना केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.