खापा, वार्ताहर :- शहरातील कुंभारपुरा स्थित प्रबुद्ध बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने सोमवारी रात्री बारा वाजता समाजबांधव व परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. त्यानंतर मंगळावर दि. १४ एप्रिल सकाळी ९ वाजता बुद्ध वंदना करून प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध विहार पासून रॅली काढण्यात आली. ही रॅली बाजार चौक, भवानी माता मंदिर चौक या मार्गे नगरपरिषद येथे पोहोचली. या रॅलीचे नगरपरिषद येथे नगराध्यक्ष पियुष बुरडे यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. तिथून परत प्रबुद्ध बुद्ध विहार येथे रॅलीचे समापन करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सर्व उपासक, उपासिका व परिसरातील नागरिकांना भोजनदान करण्यात आले. तसेच श्रद्धा, श्रावणी नानवटकर सिस्टर्स यांच्याद्वारे संचलित ऑर्केस्ट्रा गृप, हेटी (ता. सावनेर) द्वारा भीम गीत सादरीकरण करण्यात आले. उपस्थित सर्व समाज बांधवांनी व परिसरातील नागरिकांनी आस्वाद घेतला.
या आयोजनासाठी देवाजी बोरकर, ईश्वर मारोतकर, आकाश बोरकर, किशोर बुरडे, सचिन भैसारे, नामदेव हरडे, शुद्धोधन पाटील, साजन मानकर, ज्ञानेश्वर बागडे, स्वप्निल धराडे, पराग चिंचखेडे, रवींद्र कवडे, मुकेश पावडे, सिद्धार्थ भैसारे, सचिन निकोसे यांच्यासह समाज बांधवांनी व परिसरातील नागरिकांनी अथक प्रयत्न आणि सहकार्य केले.








