spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन 31 डिसेंबरपर्यंत मुदत

यवतमाळ :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नवीन किंवा नुतनीकरण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात हार्डकॉपी सादर करावी. अर्ज सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन श्रीमती मंगला मुन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.