spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ. हरिभाऊ आदमने कॉलेज मध्ये वाणिज्य विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन

खापा :- डॉ. हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय, सावनेर येथे बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी वाणिज्य विभागातर्फे C.D.S. India आणि B.S.E. यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विद्यापीठातील NEP अभ्यासक्रमातील स्टार्टअप विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. सागर तवर, डिपार्टमेंट ऑफ लॉ, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर यांनी Exploring The Securities Market & Career Opportunities ह्या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना जीवनात आर्थिक बचत तसेच शेअर मार्केटच्या माध्यमातून सुरक्षित गुंतवणुकीला प्रोत्साहित करून त्यातून रोजगाराच्या दृष्टीने मिळणाऱ्या संधीचे अध्ययन आणि त्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान आपल्या चर्चेतून वक्त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनातून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. प्रफुल जोहर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तसेच प्रा. बावणे यांनी उपस्थित मान्यवर वक्ते आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रम यशस्वीतेच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

Popular Articles