– २८ मे पर्यंत दावे हरकती नोंदवता येणार
हंसराज,भंडारा :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या २०२६ पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ, भंडारा गोंदिया बाबत प्रारूप मतदारयादी व मतदान केंद्रांची यादी गुरुवार २१ मे २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालये इत्यादी सर्व पदनिर्देशित स्थानांवर उपलब्ध आहे.
ज्यांना मतदार यादी किंवा मतदान केंद्रांच्या यादीमध्ये दावे/हरकती करायच्या असतील, त्यांनी यादी प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत म्हणजे २८ मे २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आपले दावे/हरकती सादर करावीत. दावे/हरकती पुढील कार्यालयात सादर करावेत.
मतदार नोंदणी अधिकारी, स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, जिल्हाधिकारी,भंडारा यांचे कार्यालय.
संपर्कासाठी: जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा