काटोल २३ : दिनांक २१/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनाक २२/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये बापु रोहोम, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल विभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत अण्णाभाऊ साठे नगर, पेठ बुधवार, काळे चौक, हत्तीखाना, सावरगाव रोड, भटपुरा येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन बापू रोहोम यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असून रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरहाडती घेण्यात आली तसेच सावरगाव रोड आणि गळपुरा चौक येथे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशन काटोल चे अधिकारी, अंमलदार आणि दंगा नियत्रण पथकाचे अंमलदार हजर होत



