किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत बोरी घिवारी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार (ता.१ मे )ला ध्वजारोहण करून शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जि.प. शाळेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.गावातील दिव्यांग बांधवांना ५% निधीचे वाटप करून सन्मानित करण्यात आले.
शिक्षणाला चालना आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास सरपंच विशाल सेलोकर , उपसरपंच दिनेश पटले,डॉ. समीक्षा महल्ले , ग्रामविकास अधिकारी वैभव बावनकर, ग्रामपंचायत सदस्यगण नंदलाल खंडाईत, सुषमा राऊत, व्यंकटरमणा जित्तुगा, सरस्वती पंपना, संगीता गभणे, मेघा बोंबले सह मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आशा, अंगणवाडी सेविका, मदनीस, कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.