तिरोडा :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियान अंतर्गत प्रयास लोकसंचालित साधन केंद्र परसवाडा (प्रभाग अर्जुनी )येथे आठवी वार्षिक सर्व साधारण सभेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष – संगीता भगत (CMRC अध्यक्ष) प्रमुख पाहुणे – चतृभुज बिसेन जि.प.सदस्य, हुपराज जमईवार प.स.सदस्य , चेतलाल भगत प.स.सदस्य, सुनिता राहांगडाले ग्राम.प.सरपंच ,कैलाश मेश्राम स आकाश icici बॅंक तिरोडा, भुवन पटले ,मोरेस्वर चव्हाण icici bank तिरोडा , एन. डी. बांगरे उपजीविका सल्हागार तालुका अभियान, ,सुषमा कावळे CMRC सचिव व CMRC कार्यकारिणी सर्वांनी सर्व प्रथम क्रांती ज्योती सावित्री फुले याच्या फोटोचे पुजन करून प्रेरणा गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नंतर स्वागत नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले CMRC चे व्यवस्थापक मनोज बोरकर यांनी CMRC चे प्रास्ताविक सादर केले. CMRC च्या सचिव सुषमा कावळे यांनी उत्पन्न व खर्च विषयी अहवाल वाचन करून सागितले.
मान्यवरांच्या हस्ते अहवाल पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. स्टाँल, तिरंगा थाली, पोषण आहार यांची मान्यवरांनी पाहणी केली. व मान्यवरांच्या मार्गदर्शनाला सुरूवात करण्यात आली. चतुरभुज बिसेन यांनी बचत गटामुळे आज महिला किती समोर गेल्या याविषयी मार्गदर्शन केले . Icici बॅंक येथील कैलास मेश्राम यांनी महिलांना बॅंक कर्ज तसेच बचत गटातील सर्व महिलांना गटाचे रेकॉर्ड समझायला पाहिजे त्याचेविषयी मार्गदर्शन केले .एन.डी.बांगरे यांनी सायलेज चारा लागवड व दूध वाढीविषयी मार्गदर्शन केले.जास्त कर्ज घेणाऱ्या माऊली स्व.सहा.म. ब. गट परसवाडा ला ICICI Bank चे आकाश व कैलास मेश्राम याच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. नंतर महिलांचे मनोगत, गीत पर्यावरण नृत्य एकल नृत्य घेण्यात आले. व नंतर अध्यक्षीय भाषणाला सुरूवात झाली. व मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ vo, उत्कृष्ठ गट, व जास्त कर्ज घेणारा गटांना व मनोगत व्यक्त करणाऱ्या महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूनिता पारधी सहयोगिनी यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोज बोरकर प्रभाग समन्वयक अर्जुनी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अल्का पटले सहयोगिनी यांनी केले.आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्व EC/RGB मेंबर, सुनील भगत CMRC लेखापाल, सहयोगिनी, CLDC गौतम सर,ctc CRP, vo लेखापाल , तसेच 14 गावातुन आलेल्या गावातील बचत गटातील सदस्य उपस्थित होते.




