तिरोडा :- सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) तिरोडा तालुक्यातील सिल्ली ते खेडेपार या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र, दोन ते तीन महिन्यांतच या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, त्यामुळे दुचाकी किंवा वाहनांवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर १६ ऑक्टोबर रोजी खड्ड्यांमध्ये झाडांच्या फांद्या टाकून आंदोलन करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांना निवेदन सादर करण्यात आले आहे. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे .आणि वाळू आणि इतर साहित्य वाहून नेणारे मोठे ट्रक वारंवार येथून जात आहेत. रस्त्याची वाहन क्षमता १५ टन असली तरी, सार्वजनिक बांधकाम विभागाने फलक लावला आहे, परंतु हा फलक फक्त नावापुरताच आहे. हा रस्ता १५ टनांपेक्षा जास्त वाहून नेत असल्याने, संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डेच दिसुन येतआहे. या रस्त्याने प्रवास करने धोकादायक बनले आहे. अनेक वाहने रस्त्यावरून घसरली आहेत.त्यात काही किरकोळ जखमी झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठीच 16 आक्टोबर आंदोलन करणार आहेत. ज्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधून रस्त्याचे विल्हेवाट लावतील.



