spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाकोडी येथील वगरात बुडून वृद्धाचा मृत्यू

खापा :- तालुक्यातील खापा शहराच्या नजीकच्या वाकोडी येथे मातामाय मंदिर जवळील वाकोडीच्या वघरात एक मृतदेह आढळल्याची घटना (दि. २८ डिसेंबर) रोज रविवारला दुपारी तीन वाजता दरम्यान उघडकीस आली. यादवराव आनंदराव रोहनकर (वय अंदाजे ६५ वर्ष) असून वाकोडी तालुका सावनेर येथील रहिवासी आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुंभारे या शेतकऱ्याला वाकोडीच्या वघर पात्रात यादवराव यांचा मृतदेह दिसला. यादवराव यांचे लग्न न झाल्यामुळे एकटेच राहायचे. यादवराव यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची गावकऱ्यांनी सांगितले. यादवराव हे फिरता फिरता वाकोडीच्या वगरात गेले असावे असे गावकऱ्यांनी सांगितले. कुंभारे यांनी गावातील पोलीस पाटील राहुल संभे व ग्रामपंचायत सदस्य आशिष खोरगडे यांना माहिती दिली. यांनी त्वरित खापा पोलिसांना माहिती दिली आणि खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जगदीश पालीवाल, पीएसआय सचिन जंगम घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड घटनास्थळी दाखल झाले. यांच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे प्राथमिक तपास व शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नाही. बातमी लिहेपर्यंत घटनेची नोंद झालेली नाही. खापा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Popular Articles