Home Latest News आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

0
46

नागपूर :- दिनांक ११ मार्च २०२६ रोजी नवीन सुभेदार येथील एडुसन फाऊंडेशन येथे, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्यमी महिलांसाठी उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला सशक्तीकरण व महिलांना आत्मनिर्भर बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या शिबिरास अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

या कार्यक्रमाचे आयोजन एडुसन फाऊंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून MCED येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी करुणा शेंडे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत उद्योग विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, बँकमार्फत मिळणारे सुलभ कर्ज तसेच विभागामार्फत आयोजित EDP कार्यशाळांविषयी माहिती दिली.

यावेळी एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांनीही उद्यमी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांच्या उद्योगविकासाशी संबंधित प्रश्न संस्थेच्या माध्यमातून सोडविण्यात येतील व आवश्यक ते सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला एडुसन फाऊंडेशन महिला सशक्तीकरण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.