कामठी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामविकासला चालना देण्यासाठी व ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील समितीकडून कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कवठा- म्हसाळा ग्रामपंचतीला भेट देत मूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात आली.यावेळी पंचायत विभाग आर ए पवार टीम चे वाशिम जिल्हा पंचायत समिती मानोर येथील गटविकास अधिकारी विलास जाधव तसेच विस्तार अधिकारी ए जे वाघमारे, गट शिक्षण अधिकारी ए बी पवार, कनिष्ठ अभियंता सागर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. या समितीचे गट ग्रामपंचायत कवठा म्हसाळा ग्रा प च्या वतीने व अतिथी देवो भव या संकल्पनेतुन पारंपरिक पद्धतीने औक्षण, शाॅल हार तुरे सन्मान चिन्ह देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नंतर टिम वेग वेगळी होऊन केलेल्या कामाचे अवलोकन करण्यासाठी खंड विकास अधिकारी यांना शाळा, अंगणवाडी, ग्रिन जिम, इंडोर जिम, नर्सरी, परसबाग, बंधारा ,गंतव्य मोक्षधाम, अखेर मोक्षधाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, सार्वजनिक शौचालय वाॅटर, ए टि एम मनरेगा अंतर्गत लावलेले झाडे, घरकुल पानंध रस्ते, सोलर, बंद्धिष्त गटारे, शोषखड्डे, पाणी पुरवठा, विहिरी, बोरवेल, आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींन्वये गावातील लोकांना दिलेल्या सेवा जसे की तिकीट बुकिंग, इलेक्ट्रिक बिल भरणा, जातीचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, दिव्यांग यु आई डी कार्ड रजिस्ट्रेशन, इंतभु कामाची सखोल पाहणी करीत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला .तसेच
ग्राम पंचायतीच्या श्वान आणि प्राण असलेले 1 ते 33 नमुने यांची तपासणी केली.
या मूल्यमापन प्रक्रिये दरम्यान सरपंच उपसरपंच, सदस्य, खंडविकास अधिकारी,आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका, बचत गट, सि आर पी , जेष्ठ नागरिक गावकरी व ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग सह ग्रामस्थानीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धात्मकतेतून विकासाला चालना
– या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धात्मकता निर्माण होऊन विकासकामांची गुणवत्ता वाढेल तसेच सकारात्मकता उपक्रमांना गती मिळून ग्रामपंचायतिचा सर्वांगीण विकास साधला जाईल एकूणच या मूल्यमापणामुळे गावपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.असे मत समितीने व्यक्त केले