spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हृदय प्रत्यारोपणासह २० आजारांच्या उपचारासाठी साह्य मुख्यमंत्री सहायता निधीमुळे रुग्णांना दिलासा

नागपूर :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे हृदय, किडनी प्रत्यारोपणासहच एकूण वीस प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी आर्थिक साह्य करण्यात येत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साह्य मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन केला आहे. विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना या योजनेचा लाभ होत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत जवळपास वीस प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साह्य केले जाते. हे आजार असे- १) कॉकलियर इम्प्लांट (अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया, वय २ ते ६ वर्षे), २) हृदय प्रत्यारोपण, ३) यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण, ३) मुत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण, 5) फुफ्फुस (लंग्ज) प्रत्यारोपण, ६) अस्थी मज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रांसप्लांट), ७) हाताचे प्रत्यारोपण, ८) कर्करोग शस्त्रक्रिया, ९) ककर्रोग शस्त्रक्रिया, १०) ककर्रोग औषधोपचार, किरणोपचार (कँसर किमोथेरपी, रेडिओथेरपी), ११) अस्थिबंधन (सजर्री फॉर लिगामेंट इंज्युरी), १२) नवजात शिशू संबंधित आजार, १३) ) गुडघा प्रत्यारोपण (नी रिप्लेसमेंट), १४) रस्ते अपघातामुळे आवश्यक उपचार, १५) लहान बालकांशी संबंधित शस्त्रक्रिया, १६) मेंदूचे आजार, १७) हृदय रोग, १८) डायलिसिस, १९) जळीत रुग्ण २०) विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे सीएसआर अंतगर्त विशेष निधी उपलब्ध होऊन गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणार असल्याचे नागपूर येथील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख व सदस्य सचिव डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.