spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वानाडोंगरीत सुद्धा अजगराचा कहर, सर्पमित्रांनी दाखवली शौर्याची किमया!

हिंगणा :- वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील सत्य साई ग्रामीण सेवा केंद्राजवळ आज सोमवार रात्री ९ वाजता दरम्यान मोठी खळबळ उडाली. मते यांच्या शेताजवळ असलेल्या मकानाजवळ अचानक भला मोठा अजगर दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले. आकाश मेश्राम, अविनाश लोखंडे आणि विजय रहांगडाले या सर्पमित्रांनी धाडस दाखवत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. विशेष म्हणजे अजगराला कोणतीही इजा न करता त्याला निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आले.

सर्पमित्रांच्या या धाडसी कामगिरीचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले असून, गावकऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या या तिघांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.