निलज येथील जिओच्या टॉवरच्या रेंज मशीन सह महागड्या बॅटऱ्याही चोरीला, ऑनलाइन पेमेंट होत नसल्याने मोबाईल ग्राहक सहा दिवसापासून कमालीचे त्रस्त 

0
45

किशोर साहू, मौदा, ता. २४ :- मौदा तालुक्यातील सीमेल लगत असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निलज येथील जिओ टावर च्या रेंज मशीन सह महागड्या बॅटरी सहा दिवसापूर्वी चोरीला गेल्याने मोबाईलला रेंज (कव्हरेज) पूर्णपणे मिळत नसल्याने , ऑनलाइन पेमेंट होत नसल्याचे निलज येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चकोले यांनी आज शुक्रवार ( दि. 23 जानेवारी)ला सांगितले त्यामुळे नीलज सह परिसरातील जिओचे सिम धारक ग्राहक वर्ग कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी वर्गाने जिओच्या टावर मध्ये रेंज मशीन व नवीन बॅटरी बसवून लवकरात लवकर ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी रवींद्र चकोले सह निलज व परिसरातील जिओ सिम धारकांनी केले आहे.