spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोने येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न

पालघर :- पालघर जिल्हा परिषद केंद्र शाळा कोने येथे जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदलीने नवीन हजर झालेले शिक्षक मयूर शेलार यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते हार्दिक स्वागत करण्यात आले तसेच कोने शाळेतून खुपरी येथे बदली झालेले शिक्षक सुनिल सिद्धा शिंदे यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. अशा दुहेरी कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा कोने येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माजी सदस्या भक्ती वलटे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाई वलटे,  कीर्ती भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गायत्री पांढरे, रोहिणी पांढरे,कोने गावचे सरपंच रामदास कदम , कोने गावचे माजी सरपंच चिंतामण तरसे, कोने केंद्राचे केंद्रप्रमुख शिंदे, बाळू दिवा, जगदीश दुपारे , रमेश भोईर, सेजल सजन दुपारे व पालक वर्ग, माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक सावंत , पदवीधर शिक्षक शेलार, सहशिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी शिंदे यांनी आज पर्यंत केलेल्या शैक्षणिक कामाचे कौतुक केले अत्यंत तळमळीने शिकवणारे शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक अशा शब्दात वर्णन करून त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करत असताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू येत होते. शेवटी सुनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनो शाळा शिका, खूप मोठे व्हा, आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर पोहोचा आणि ते पाहण्यातच मला खूप आनंद वाटेल असे शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यापुढेही माझे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार अशी ग्वाही त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना दिली. शिंदे सरांच्या मनोगतानंतर सर्व विद्यार्थी, उपस्थित पालक वर्ग ,सर्व मान्यवरांनी अश्रू पूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला. आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.